जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गच्चीवरील वस्तू घेण्यासाठी जीन्यवरून जात असतांना अचानक जीना तुटून अंगावर पडल्याने ७० वर्षीय वयोवृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे घडली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत मांगो वाघ (वय-७०) रा. देवप्रिपी ता.जामनेर हे आपल्या दोन मुले, पत्नीसह वास्तव्याला आहे. रविवारी १२ जून रोजी सायंकाळी पाऊस आल्याने छतावर ठेवलेल्या महत्वाच्या वस्तू घेण्यासाठी जीन्यातून जात असतांना तीन महिन्यापूर्वी बांधलेला जीना अचानक तुटून पडला. यात यशवंत वाघ यांच्या कमरेला व पोटाला लागल्याने गंभीर जखमी झाले. जखमीवस्थेत नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. सोमवारी १३ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.