Home क्राईम भुसावळात वृध्दाला मारहाण करून लुटले

भुसावळात वृध्दाला मारहाण करून लुटले


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील कृष्णालीला हॉटेल जवळ ७७ वर्षीय वृध्द व्यक्तीचा रस्ता आडवून अनोळखी व्यक्तीने पाठीवर व मानेवार चापटा मारून पिशवीतीन ७ हजार रूपयांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना गुरूवारी ८ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, बुढनशाह रमजानशहा छप्परबंद वय ७७ रा. मुस्लिम कॉलनी हे वृध्द व्यक्ती गुरूवारी ८ मे रोजी रात्री १०.३० वाजता शहरातील कृष्णालीला हॉटेल जवळून पायी जात असतांना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येवून त्यांना पाठीवर आणि मानेवर चापटा मारून त्यांच्या जवळील पिशवीतील ७ हजार रूपये काढून जबरी हिसकावून घेतले. तसेच कुणाला काही सांगितले तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. वृध्द व्यक्तीने तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.


Protected Content

Play sound