Home क्राईम वृध्द शेतकऱ्याचे बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लांबविला

वृध्द शेतकऱ्याचे बंद घर फोडून २ लाखांचा ऐवज लांबविला


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील आंबेहोळ येथील एकाचे बंद घर फोडून सुमारे १ लाख ९८ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील आंबेहोळ येथे पदम परशराम जाधव वय ६५ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १५ ते १६ जुलै रोजच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्या चांदीचे दागिने, रोकड आणि कपाटातील कपडे असा एकुण १ लाख ९८ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार १६ जुलै रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound