Home क्राईम विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; भोकरीतील घटना

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; भोकरीतील घटना


Electric Shock Danger DC Photo 0 0 1 0

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील भोकरी येथे पंखाची पिन लावत असतांना 35 वर्षीय महिलेला विजेच्या जोरदार धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेबाबत रावेर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील भोकरी येथील महिलेची नाव ज्योती वसंत लहासे (वय ३५) ह्या मंगळवारी सायंकाळी राहत्या घरात पंखा सुरु करण्यासाठी प्लग मध्ये पिनची वायर लावताना इलेक्ट्रिक शॉक लागला. नातेवाईकांनी तिला जखमीस्थितीत रावेर ग्रामीण दाखल केले. तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला यांनी खबर दिल्याने रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.का.विजु जावरे हे पुढील तपास करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound