मुंबई प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्याने त्यांना बॉंबे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पीटलने दिली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या आठ दिवसांपासून बॉंबे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त टिव्ही नाईन या वृत्त वाहिनीने दिले आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी ईडीने अटक केली असून खडसेंचीही चौकशी केली आहे. तर त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांची देखील चौकशी होणार असून याबाबतचे समन्स त्यांना बजावण्यात आले आहेत.
एकनाथराव खडसे यांनी २२ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानंतर ते सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये दिसून आले नव्हते. ते मुंबईला असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आता त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.