मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाचा निकाल प्रलंबीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ख्यातनाम विधीज्ज्ञ उज्वल निकम यांच्याशी रात्री सल्लामसलत केल्याचे वृत्त आहे.
राज्यातील सत्ता संघर्षाबाबत काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यात न्यायालयाने तूर्तास चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश देत घटनापीठाबाबत निर्णय हा सोमवार ८ ऑगस्ट रोजी घेतला जाईल असे नमूद केले होते. यामुळे आता सुप्रीम कोर्टात नेमके काय होणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. तर, याच पार्श्वभूमिवर, विशेष सरकार वकील ख्यातनाम विधीज्ज्ञ उज्वल निकम यांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
काल रात्री उशीरा निकम आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. निकम यांनी अनेक खटल्यांमध्ये अतिशय प्रभावी कामगिरी केल्यामुळे ते वलयांकीत विधीज्ज्ञ म्हणून गणले जातात. या पार्श्वभूमिवर, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी वार्तालाप केल्याचे आता मानले जात आहे.