मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रात्री उशीरा भेट घेऊन चर्चा केल्याचे वृत्त आहे.

दिल्ली दौर्‍यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यासोबत भेट झाली नव्हती. पण, काल रात्री उशीरा ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास ३० ते ४० मिनिटं चर्चा सुरु होती.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत अमित शाह यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं आहे. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

 

 

Protected Content