नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री दोन वाजेपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली असून यातून मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याचे मानले जात आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दुपारी दिल्लीत पोहचले. त्यांनी रात्री आठच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शाह यांनी दोघांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना विठ्ठल-रूक्मीणीची मूर्ती भेट दिली. यानंतर तिन्ही मान्यवरांमध्ये तब्बल चार तास बैठक पार पडली. यात सत्ता स्थापनेनंतरच्या आव्हानांपासून ते मंत्रीमंडळाबाबत सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीत ११ जुलै रोजी न्यायालयात होणार्या सुनावणीबाबत इत्यंभूत चर्चा करण्यात आली. तर राज्यातील मंत्रीमंडळाचे खातेवाटप आणि संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल करण्यात आल्याचे मानले जात आहे. आज शिंदे आणि फडणवीस हे पंतप्रधानांना भेटून सायंकाळी मुंबई येथे परतणार आहेत. सुप्रीम कोर्टातील निकालानंतर १२ जुलै रोजी मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार होईल. यात दोन्ही बाजूंचे प्रत्येकी पाच असे एकूण १० मंत्री शपथ घेतील. तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उर्वरीत मंत्री शपथ घेतील अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.