मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी सभागृहात पेन ड्राईव्हचा गौप्यस्फोट केल्यानंतर आज आमदार एकनाथराव खडसे Eknath Khadse यांनी विधानपरिषदेत ‘पेन ड्राईव्ह’ सादर करून खळबळ उडवून दिली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह सादर केला. यात त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला लागून असणार्या पुरनाड येथील आरटीओच्या आंतरराज्यीय चेकनाक्यावरील गैरव्यवहाराची माहिती सादर केली. यात त्यांनी प्रत्येक ट्रक धारकापासून एक ते दोन हजार रूपये घेण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यातून दिवसाला किमान दहा ते बारा लाख रूपयांचा घोळ होत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
दरम्यान, खडसे पुन्हा म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमीनीतील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. यात आष्टी तालुक्यात एक हजार रूपयांपेक्षा जास्तचा घोळ झाला असून येथे एसआयटीची चौकशी सुरू आहे. यातील चौकशीत अनेक राजकीय नेत्यांची नावे येऊन देखील यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर याची चौकशी करणार्या पंकज कुमावत यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या ऐवजी कनीष्ठ अधिकार्याकडे या तपासाला सोपविण्यात आले आहे. Livetrends News याची तातडीने चौकशी करण्याचा आरोप नाथाभाऊंनी केला. यात काही राजकारणी आणि आमदारांचाही समावेश असल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला.
नाथाभाऊ यांनी नंतर त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, यात तीन जणांच्या विरोधात गंभीर कलमांच्या खाली गुन्हे दाखल करण्यात आले. यात आजवर या तिन्ही जणांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन सरकारने नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. मात्र त्यांनी चौकशी केली नाही. मात्र, पोलिसांनी आरोपींना संरक्षण दिले. यात छोटू भोई यांच्या विरोधात २००५ पासून अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुंडांना राज्याचे मुख्यमंत्री संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. Livetrends News या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
यानंतर त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात महिलांना देण्यात आलेल्या धमक्यांचे ऑडिओ रेकॉर्डींग सादर केले. यात त्यांनी महिलांना धमकावून त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात येत असून याचे पुरावे आपण सादर करत असल्याचे सांगितले. या प्रकरणी तातडीने या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाथाभाऊंनी केली.