पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व आदिवासी भिल्ल बांधवांचा विविध मागण्यांसंदर्भात एकलव्य संघटनेचा वतीने २२ ऑगस्ट रोजी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी गुरूवार १३ जुलै रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत दिली.
सदर मोर्चात आदिवासी भिल्ल समाज बांधवांना घरकुल, गायरान जमीन संदर्भात आलेल्या नोटिसा रद्द करण्यात यावे, धनदांडगे लोकांनी गायरान गावठाण जमीनीवर मोठ मोठे खळे गोठे बांधून घेतलेले ते अतिक्रमण हटवण्या बाबत, स्मशानभूमी, रेशनकार्ड, जातीचे दाखले, मुलभुत सुवीधापासुन वंचित बांधवांना सुविधा मिळणे, आदिवासी भिल्ल समाजाचे पुनर्वसन, या संदर्भात एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्वात मोर्चा आयोजन बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हा अध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड, दादाभाऊ जाधव, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, प्रताप सोनवणे, बबन मोरे, गणेश बहिरम, राजु सोनवणे, ईश्वर ठाकरे, संजय गायकवाड, पिंटू मोरे, संतोष महाले, सुकलाल मोरे, यांच्या सह एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सदर मोर्चा जळगाव चौफुली जामनेर रस्ता ते प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी दिली.