यावल प्रतिनिधी । धामणगाव बढे येथिल हनुमान मंदिराच्या सोनाई सभागृहात रविवारी जमाअते इस्लामी हिंद व एसआयओ युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
धामणगाव बढे ( जि. बुलढाणा) येथील मारूती मंदिरात रविवारी ईद मीलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंदिरात ईद मीलन कार्यक्रम आयोजित करण्याची परंपर येथे गत ३२ वर्षांपासून सुरू आहे हे विशेष.
या कार्यक्रमाला एसआयओ चे माजी प्रदेशाध्यक्ष सोहेल अमीर शेख प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित नागरिक हारूनखा प्यारखा तर मुख्य उपस्थितांमध्ये अबुबकर पटेल जामा मस्जिदचे मौलाना हनिफ मिल्ली, धामगाव बढे ग्रामपंचायतचे सरपंच अॅड युवराज घोंगडे, कृष्णा भोरे उपसरपंच, रियाज पटेल, दिनकर बढे, योगेश जाधव यांच्यासह असंख्य हिंदू मुस्लिम बांधव व महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या,
या हिन्दु मुस्लीम बांधवांच्या संयुक्तरित्या आयोजीत या ईद मिलन कार्यक्रमास मान्यवरांनी विचार व्यक्त केल. पवित्र रमजानच्या ईद मिलनच्या कार्यक्रमास अनेक वर्षांपासुन हिंदूच्या पवित्र व श्रद्धास्थान हनुमान मंदिराचे सोनाई सभागृहात होत असल्याने हे संपूर्ण देशात एक जातिय सलोख्याचा आदर्श बनले आहे. सुमारे १८हजारांच्या जवळपास लोकसंख्या असणार्या या गावात दोन्ही समाजांमध्ये एकोपा दिसून येतो. धामणगाव बढे सारख्या जातिय सलोख्याच्या गावात या द्वेषाला मुठमाती दिल्याचा अनेक वर्षाचा अनुभव असुन हा आदर्श इतरांनी घ्यावा अशी भावना सोहेल यांनी व्यक्त केली. सुत्र संचालन शेख रफिक शेख बशीर यांनी केले. तर आभार मोहसिन पटेल यांनी मानले.