जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुस्लिम बांधवांचा सर्वात पवित्र, मोठा व महत्त्वपूर्ण सण जशने ईद – ए – मिलाद ऊन नबी संपूर्ण जगात मोठ्या जुलूस काढून आनंदात, उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे दर सालाबाद प्रमाणे यंदाही जळगाव शहरातील अहेले सुन्नत वल जमात, तमाम आशिकाने रसूल, गुलामाने रसूल यांनी अत्यंत उत्साहात, जल्लोषात, आनंदात आज दि. 18 सप्टेंबर 2024 बुधवार रोजी मरकझी ( मुख्य) जुलुसे ईद – ए – मिलाद ऊन नबी चे यशस्वी आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रसंगी जुलूस च्या अग्रभागी घोडेस्वार होते. तसेच सजवलेल्या तीन बग्गीन्नवर धर्मगुरू बसलेले होते. या प्रसंगी सर्व लोकांच्या हाती इस्लामी ध्वज होते. या प्रसंगी ” सरकार की आमद मरहबा, रसूल की आमद मरहबा, मरहबा या मुस्तफा मरहबा, जशने ईद मिलादुन्नबी जिंदाबाद, नारा ए तकबीर अल्लाहू अकबर, नारा ए रिसालत या रसूल अल्लाह, यासीन की आमद मरहबा, ताहा की आमद मरहबा अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडलेला होता. जुलूस सुभाष चौकात आल्यावर पारंपारिक पद्धतीने अजान देण्यात आली. सुभाष चौकात पोलीस प्रशासना तर्फे जुनू चे स्वागत करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी जुलै चे स्वागत करण्यात येऊन जुलूस मध्ये सामील लोकांना सरबत, मिठाई, नानखटाई, दूध कोल्ड्रिंक, पोहे, केळी असे विविध खाद्यपदार्थ विचलित करण्यात आले. जुलूस मध्ये सामील बहुतेक लोकांनी इस्लामी कपडे परिधान केलेले होते. जुलूस ची सुरुवात सकाळी 10:00 वाजता भिलपुरा येथील इमाम अहमद चौकातून होऊन पुढे घाणेकर चौक, सुभाष चौक, आठवडे बाजार चौक नेरी नाका, अजिंठा रोड वरील मुस्लिम कब्रस्तानात येऊन सलातो सलाम, नाते पाक, कुरान खानी, फातिहा व बयान (प्रवचन )होऊन सांगता सांगता करण्यात आली. या प्रसंगी जुलुस कमिटी जळगावव सुन्नी जामा मस्जिद जळगाव चे सै. अयाज अली नियाज अली यांनी आलेल्या सर्व समाज बांधवांचे स्वागत करून जळगाव जिल्हा पोलीस दल जळगाव शहर महानगरपालिका व समाज बांधवांचे जुलूस यशस्वी करण्यासाठी केलेल्या सहकार्याचे आभार मानून अभिनंदन केले. सर्वांनी शांततेत व कायद्याच्या चौकटीत राहूनच ईद मिलाद साजरी करावी असे आवाहन केले. या प्रसंगी मौलाना जाबीर रजा, मौलाना वासेफ रजा यांनी प्रवचन केले. तसेच मौलाना नजमूल हक यांनी देशाच्या सुरक्षा, प्रगती, विकासासाठी व शांततेसाठी दुआ केली.
याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा मौलाना वासेफ रजा, मौलाना नजमुल हक मिस्बाही , मौलाना अब्दुल रहीम कादरी, मौलाना नौशाद साबरी, मौलाना आरीफ रजा, मौलाना रफीक रजवी, सय्यद जावेद, अमान ठेकेदार, नुरा पैलवान, जावेद गुलाम गौस, कामिल खान, रईस चांद, काशीफ टेलर, शाकीर चीतलवाला, मुक्तार शहा, मुस्ताकिम खान, सय्यद उमर, इरफान जावेद, सय्यद वाजिद, तुराब शाह, मुबारक तेली, कामिल शेख, इरफान खान, उमर काकर, सय्यद सिद्धिक, सय्यद सुम्मा, इरफान जाफर यांसह भीलपुरा, नियामतपुरा, इस्लामपुरा, काट्या फाईल, मुघल गार्डन, चिस्तिया पार्क, उमर कॉलनी, उस्मानिया पार्क, केजीएन कॉलनी, एबी कॉलनी, भारत नगर, गेंदालालमिल,ऐलान चौक, लक्ष्मीनगर, सिटी कॉलनी, शिवाजीनगर, सय्यद असरार नगर, शिवाजीनगर हुडको, मासूम वाडी, कासमवाडी, शाहूनगर यांसह संपूर्ण शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.