भुसावळात ईद व गणेशोत्सव शांततेत होणार; एसपी एम. राजकुमार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शांतताप्रिय व उत्सव प्रिय नागरिकांवर माझा पूर्णपणे विश्वास असून येणारा गणेश उत्सव व ईद हे दोघेही सण अत्यंत उत्साहात व शांततेत संपन्न होतील असा आशावाद पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केला.

भुसावळ शहरातील संतोषी माता सभागृहात गणेश उत्सव व ईद निमित्त आयोजित संयुक्त शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. श्री. राजकुमार पुढे म्हणाले की भुसावळ शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी नेते नगरसेवक माजी नगरसेवक व समाजसेवक आज मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्यांना शासनाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा तसेच काही नियम व अटी ज्या आहेत, त्या समजावून सांगण्यासाठी व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी ही बैठक घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. मंडळाच्या ज्या काही शासनाकडून रास्त अशा मागण्या असतील त्या सर्व जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर त्या निश्चितपणे सोडवतील मंडळांनी देखील त्यांना जिल्हा प्रशासनाला सहकार्य करायचे आहे असेही श्री. राजकुमार यांनी सांगितले.

सर्वप्रथम उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यामध्ये जिल्हाधिकारी पियुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील व तीनही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सर्व कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पियुष प्रसाद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून भुसावळकरांना उत्साहात व शांततेत हे दोन्ही सण साजरे करावे असे सांगितले. प्रसंगी अधिकाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम पंच कमिटी सदस्य, इमान व शहरातील मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थितांचे  आभार मानले.

Protected Content