पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा ते भडगाव दरम्यान दोन आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असुन दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बांबरुड (महादेवाचे) जवळील तितुर नदी पुलाजवळ भुसावळहुन मुंबईला केळी घेवुन जाणारी आयशर (क्र. एमएच. ४६ एआर. ३८८८) व भडगाव कडुन पाचोरा कडे येणारी रिकामी आयशर (क्र. एमएच. २० बीटी. २२४७) या दोन्ही आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. यात भुसावळहुन मुंबईकडे जाणाऱ्या आयशर चालक इलियास शेख (वय – ४६ रा. भुसावळ) हे जागीच ठार झाले असुन इम्तियाज खान (वय – ४३) व शाहरुख सलिम खान (वय – २८ रा. जाम मोहल्ला, भुसावळ) हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने या गंभीर विषयाकडे संबंधित कंत्राटदार कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे.