युवा स्कीलच्या माध्यमातून तरूणांना रोजगार प्रदान करण्याचे प्रयत्न-सरदेसाई ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | युवा सेनेच्या वाटचालीत रोजगाराला सर्वाधीक महत्व असून आम्ही युवा स्कील या योजनेच्या माध्यमातून तरूणांना विविध सॉफ्ट स्कील्सचे प्रशिक्षण देत असून याच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केले.

वही तुला व मेहरूण तलावाची पाहणी केल्यानंतर वरूण सरदेसाई यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  युवा सेनेतर्फे राज्यव्यापी संवाद दौरा सुरू आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील दौरा आजपासून सुरू करण्यात आला आहे. यानिमित्त युवा सैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शिवसेना अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर आदित्य ठाकरे यांना युवा सेनेला वेळ देता येत नसल्यामुळे याची धुरा वरूण यांच्याकडे येणार आहे का ? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, असे काही होणार नाही. युवा सेना ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच वाटचाल करत आहे. युवा सेना ही रोजगारासाठी महत्वाची भूमीका पार पाडत आहे. यासाठी युवा स्कील हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत असून याच्या माध्यमातून युवकांना विविध सॉप्ट स्कील्स शिकवण्यात येत असून यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे अशी माहिती वरूण सरदेसाई यांनी केली.

वरूण सरदेसाई पुढे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. जळगावचा विचार केला असता स्थानिक पातळीवर अतिरिक्त एमआयडीसी व्हावी असे प्रयत्न सुरू असून यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला वेग येणार असल्याचे प्रतीपादन वरूण सरदेसाई यांनी याप्रसंगी केले. तर आगामी निवडणुकांमध्ये निश्‍चीतपणे तरूणांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Protected Content