रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सजंय गांधी योजनेचे अर्थसहाय्य लाभार्थी असलेले अनाथ, दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, विधवा महिलांना आपली पेंशन काढतांना श्रम, वेळ व पैसा खर्च होतो. याची बचत व्हावी म्हणून ‘आपली पेंशन आपल्या दारी’ योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना निवासी नायब तहसिलदार सजंय तायडे यांनी केल्या आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची महत्वाकांक्षी असलेली योजना पोष्टा मार्फत ‘पेंशन आपल्या दारी’ पोहचावी म्हणून पोष्ट अधिकारी व पोष्टमन यांची सजंय गांधी योजनाच्या कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शना खाली निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी बैठक घेतली.
यावेळी बैठकीला पोष्ट मास्तर दिनेश बारी, राहुल पाटील, दिनकर हीरे, आकाश शिजवळे, पोष्ट मास्तर शांतराम महाजन, महसूल सहायक योगेश मोहीते, इंगायो महसूल सहायक अजित टोंगळे, पुरुषोत्तम महाजन आदी बैठकीला उपस्थित होते.
देण्यात आलेल्या सूचना –
उपस्थित पोष्ट अधिका-यांना तलाठी कोतवाल व डाकसेवक मार्फत जनजागृती करावी, लाभार्थी यांचे बँक खाती आधारलिंक करावे, लाभार्थीची तलाठी व पोष्ट अधिकारी यांनी गाव पातळीवर बैठक घ्यावी, संबधित लाभार्थीना कोणतेही अतीरिक्त शुल्क न घेता बँक खात्यावरील अनुदान थेट लाभार्थीना रोख स्वरुपात द्यावे. यासह अनेक सूचना बैठकीत निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे यांनी पोष्ट अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.