जळगाव प्रतिनिधी । महापालिका प्रशासनाने शहरात एलईडी लावणार्या ईईएसएल या कंपनीची शासनाकडे तक्रार केली आहे.
ईईएसएल कंपनीच्या कामाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमिवर, महापालिका प्रशासनाने नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे याचा अहवाल पाठवला आहे. दरम्यान, शहरातील तक्रारींच्या अनुषंगाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत १६ मे रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. यात कामाची गती, कामाचा दर्जा, तक्रारींचे निवारण आदी सर्वच विषयांवर चर्चा केली जाणार आहे.