कोरोनामुळे सर्व शाळांमध्ये शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती देण्याचे शिक्षणाधिकारी अकलाडे यांचे निर्देश

 

जळगाव, प्रतिनिधी ।   जिल्ह्यात कोरोनामुळे शाळाबंद असतांना शिक्षकांना उपस्थितीची सक्ती रद्द करावी अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेची मागणी केली होती. त्यानुसार शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती देण्याचे निर्देश आज १६ मार्च रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी दिले आहे. 

शाळा बंद असताना शिक्षकांना मात्र शाळेत उपस्थिती देण्याची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेतील सक्ती रद्द करावी, अथवा ही उपस्थिती ५० टक्के करावी. यासह शाळेची वेळ ही सकाळी ११.३० पर्यंतच करावी अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे, या स्थितीत शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यातून शिक्षकांना वगळून पूर्ण वेळ शाळेत थांबण्याची सक्ती केली जात आहे. सर्व शासकीय कार्यालयातील ‌उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत असताना शिक्षकांनाच पूर्ण वेळेची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शिक्षकांमध्येही कोरोना संसर्गाची भिती वाढली आहे. यासह शिक्षकांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे चुकीचे असल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेसह शिक्षकांच्या उपस्थितीची सक्तीचा नियम बदलण्याचीही मागणी शिक्षक सहकार संघटनेचे विभागीय सरचिटणीस जितेंद्र वळवी यांच्यासह शिक्षकांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. आज १६ मार्च रोजी शिक्षणाधिकारी भा. शि. अकलाडे यांनी सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ५० टक्के उपस्थिती देण्याचे निर्देश दिले आहे.

Protected Content