पुणे प्रतिनिधी । भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे वकील तथा ख्यातनाम विधीज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याकडे ईडीचे पथक या प्रकरणाशी संबंधीत चौकशी करणार आहे.
भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथराव खडसे यांना ईडीने समन्स बजावले असून ते कोरोनामुळे सध्या उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांची चौकशी होण्याआधीच त्यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात ईडीचे पथक आज दुपारी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार ईडीच्या कार्यालयातून अॅड. असीम सरोदे यांना फोन करण्यात आला असून त्यांच्याकडून ईडी भोसरी भूखंड प्रकरणाबाबत माहिती जाणून घेणार आहे.