मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असतांनाही दैनिक सामनातून त्यांच्या नावाने लेख प्रसिध्द होत असल्याने ईडी चक्रावून गेली असून या प्रकरणी आता चौकशी करण्यात येणार आहे.
खासदार राऊत हे तुरूंगात असतांनाही त्यांच्या नावाने लेख प्रकाशित होत आहेत. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे लेख लिहू शकत नाही. लेख लिहायचा असेल, तर न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय लेख लिहिता येत नाही. म्हणूनच आता या प्रकरणात ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
लक्षणीय बाब म्हणजे काल अर्थात रविवारी रविवारी सामनामध्ये प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर टीका केली होती. याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका करत शंका उपस्थित केली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राऊत हे तुरुंगातून लेख लिहायला स्वातंत्र्यसेनानाही आहेत का? असा प्रश्न देशपांडेंनी विचारला होता. आता याच प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे.