कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज पहाटेच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने छापेमारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पहाटेच ईडीच्या पथकाने छापा मारला. अजून देखील येथे तपासणी करण्यात येत आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास २० अधिकार्यांचे पथक त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यात ईडीसह इन्कम टॅक्स खात्याच्या अधिकार्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली असून मुश्रीफ कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भात ईडीतर्फे अजून तरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.