ईडीकडून इक्बाल मिर्चीच्या सहकार्याला अटक

crime bedya

मुंबई प्रतिनिधी । अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी एकेकाळी काम करणारा ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याचा खास मित्र असलेला हुमायूं मर्चंट याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि.22) मुंबईतून अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इक्बाल मिर्चीविरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंडरवर्ल्डमधून करण्यात आलेली ही पहिली मोठी अटक असणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्चंट हा इक्बाल मिर्चीचा बालमित्र होता. पुढे अंडरवर्ल्डमधील कामात देखील तो त्याचा अतिशय जवळचा सहकारी मानला जात होता. मर्चंट हा मिर्चीसाठी मालमत्तांशी संबंधित व्यवहार पाहत होता. त्याच्यावर १७० कोटी रुपयांच्या अवैध सावकारीचा आरोप आहे. तो रियल इस्टेट डेव्हलपरशी व्यवहार करत असे. इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाने दुबईत ९ मिलियन दिरहममध्ये फाइव्ह स्टार हॉटेलच्या खरेदी व्यवहारात मर्चंटचा सहभाग होता. दक्षिण मुंबईतील इमारती रियल इस्टेट विकासकांना विकण्याच्या व्यवहारात मर्चंटचा मोठा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. मिर्चीची पत्नी हजरा आणि डी कंपनीशी देखील मर्चंट याचे जवळचे संबंध आहेत. तो व्यवहार करण्यासाठी मुंबईतून लंडनला देखील जात असे. तो वरळीतील तीन मालमत्ता २२० कोटी रुपयांना खरेदी करणारी सनब्लिंक या कंपनीशी देखील जोडलेला होता. या व्यवहारातून मिर्चीला एकूण १७० कोटी रुपये मिळाले होते. अखेर सनब्लिंक रियल इस्टेटवर ईडीची नजर पडलीच. कारण या कंपनीने डीएचएफएलकडून मोठे कर्ज घेतले होते. डीएचएफएलच्या कार्यालयांमध्ये शनिवारी छापाही मारण्यात आला होता.

Protected Content