खा. संजय राऊत यांना ईडीकडून तात्पुरता दिलासा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून तात्पूरता दिलासा मिळाला आहे. ईडीने मागविलेली माहिती सादर करण्यासाठी मुदतीची मागणी केली होती. त्यावर इडीने १४ दिवसांत सर्व कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत शिवसेनेचे ४० आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. दुसरीकडे ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले आहे.

दरम्यान, ईडीने आज २७ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू अलिबामधील नियोजित दौऱ्यामुळे ते चौकशीला हजर राहू शकले नाही. त्यांच्या वकीलांना ईडीकडे १४ दिवसांची मुदतीची मागणी करून सर्व कागदपत्रे सादर करणार असल्याचा विनंती अर्ज केला होता. त्यावर ईडीने हा अर्ज स्वीकारला आहे.

काय आहे पत्राचाळीतील घोटाळा

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडा भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते.  मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले.

 

Protected Content