जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार रक्षाताई खडसे यांना दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले असून त्यांचा विजय आता निश्चीत झाला आहे. आज सकाळी पहिल्या फेरीपासून रक्षाताई खडसे यांनी मताधिक्य घेतले. प्रत्येक फेरीनंतर हा लीड वाढतच गेला. मध्यंतरी श्रीराम पाटील यांनी चार्ज झालेल्या बॅटरीजवर आक्षेप घेतल्याने काही काळ मतमोजणी बंद करण्यात आली होती. काही वेळानंतर मात्र ही मतमोजणी पुन्हा सुरू झाली.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास रक्षाताई खडसे यांना ५ लाख २९ हजार ३०६ इतकी मते मिळाली होती. तर विरोधी उमेदवार श्रीराम पाटील यांना ३ लाख ९ हजार ९८० इतकी मते मिळाली होती. या माध्यमातून त्यांना २ लाख १९ हजार ३२६ मतांची भक्कम आघाडी मिळाली असून त्यांचा विजय निश्चीत झाला आहे. तर वंचितचे उमेदवार अभियंता संजय ब्राह्मणे यांना ४८,३०४ इतकी मते मिळाली आहेत. यामुळे रक्षाताई खडसे या लागोपाठ तिसर्यांदा खासदार बनणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
02:59