खा. उन्मेष पाटील यांच्या हस्ते मासिक दिव्य भूमिचे प्रकाशन

चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते आज मासिक दिव्य भूमिचे प्रकाशन करण्यात आले.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या मासिक दिव्य भूमी प्रकाशन सोहळ्यास खासदार उन्मेश पाटील उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की योगेश मोरे यांनी मासिकाचे योग्य नियोजन करून दर्जेदार लिखाण वाचकांसमोर कसे मांडता येईल याचा प्रामुख्याने विचार करावा,प्रबोधनाचे कार्य व्हावे असेही खासदार पाटील आपल्या भाषणात म्हटले. मी मासिक, साप्ताहिक यांना नेहमीच मदत करत असतो व करत राहीन असे आश्वासनही यावेळी दिले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मासिकाचे संपादक  योगेश अशोक मोरे यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी चाळीसगाव तालुका साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी,ज्येष्ठ पत्रकार भुरन घुले, विजय सपकाळे, तन्वीर शेख, जाकीर मिर्झा, नारायण परदेशी, रामलाल चौधरी,मुराद पटेल, मुकेश गोसावी, पराग सोनार, अश्फाक पिंजारी, दैनिक जनशक्ती चे उपसंपादक तथा खासदार उन्मेषदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक अर्जुनभाऊ परदेशी, योगेश्वर राठोड,मनोहर पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

Protected Content