नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात खासदार उन्मेश पाटील यांनी वडील दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, आई मंगलाबाई पाटील, संपदा पाटील, चि. स्वामी व समर्थ यांच्यासह महामहिम राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांची ग्रेट भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या गिरणा परिक्रमेचे कौतुक केले.
आपण आपल्या परिवारासह मला भेटायला आल्याने आपल्या सामाजिक संस्काराचे प्रतिबिंब दिसून येते आहे. येत्या काळात सामाजिक विकासाचे शिक्षण लोकप्रतिनिधीकडून समाजाला अपेक्षित आहे. मी देखील आदिवासी परिवारातून आलेली असताना आर्थिक अडचणींनी तोंड देत शिक्षण घेतले. सभोवतालच्या परिसराची मी विकासाची स्वप्न पाहिली व त्यावर निरंतर काम करत राहिले त्यामुळे एकेकापदांवर काम करण्याची संधी मिळाली. आपण देखील गिरणा परिक्रमा करण्याचा संकल्प केला.त्यासाठी धडपड केली. मी देखील परिसराच्या विकासाबाबत सतत धडपड करीत राहिले. त्यामूळे अनेक संधी आपसूक आपल्यापर्यंत येतात.आज देशाच्या राष्ट्रपतीची धुरा सांभाळण्याचे भाग्य मला लाभले आहे. आई वडिलांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. देशाच्या कायदे मंडळाचे सदस्य म्हणून समाज अधिक बलवान कसा होईल वंचित घटकांना कसा अधिकाधिक लाभ होईल यासाठी परिश्रम घ्या. असे सांगत देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या गिरणा परिक्रमेचे कौतुक केले.
नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात खासदार उन्मेश पाटील यांनी वडील दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील ,आई मंगलाबाई पाटील , सौ. संपदाताई पाटील, चि.स्वामी व समर्थ यांच्यासह महामहिम राष्ट्रपतींची ग्रेट भेट घेतली.
याप्रसंगी उन्मेशदादा पाटील यांनी छत्रपतींच्या विचाराने मतदार संघात काम करीत असून छत्रपती शिवछत्रपतीची प्रतिमा आपल्यास भेट देत असल्याचे सांगितले. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी संवाद साधला. मी देखील लहानपणी आदिवासी कुटुंबाच्या वस्ती शेजारी बालपण गेल्याने आदिवासींचे दुःख त्यांच्या समस्या जवळून बघितल्या आहेत.आमदार असताना त्यासाठी विविध योजनांची शिबीर राबवून त्यांच्यासह वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विवीध शिबिरांतून केले असून सध्या मतदारसंघाची जिवनदायिनी गिरणा पुनरूज्जीवन अभियान सुरु केले आहे.
यावेळी आपने कभी सोचा था क्या आप राष्ट्रपती बनोंगे.? चि.स्वामी व समर्थांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींनी आपला जिवनप्रवास उलगडला. मी खरच असा विचार कधी केला नव्हता मात्र जी संधी मिळाली त्या संधीमध्ये जीव ओतून काम केले त्यातून एकेक यशाची पायरी मिळत गेली आणि आज सर्वाच्या साक्षीने राष्ट्रपती होण्याचे भाग्य लाभले आहे. आपली आपण देखील एकदा निश्चय केला की त्यावर परिश्रम घ्या. सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला संपदा पाटील यांनी उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या माध्यमातून राबवत असलेल्या उपक्रमात बाबत राष्ट्रपती महोदयांना अवगत केले. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संपदाताई यांचे अभिनंदन करीत नारीशक्ती ही देशाची सर्वोच्च शक्ती आहे. तिला अधिक बळकट होण्यासाठी आपण करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याची भावना राष्ट्रपती महोदयांनी यावेळी व्यक्त केली*
गिरणा परिक्रमेचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक
महामहिम राष्ट्रपतींनी यांनी आपण सध्या कोणत्या उपक्रमावर काम करत आहात असा प्रश्न केला असता खासदार उन्मेशदादा यांनी गिरणा खोऱ्याच्या विकासासाठी 380 किलोमीटरची पायी पदयात्रा केली असून यातून मतदार संघातील 190 किलोमीटरचे गिरणा खोरे समृद्ध होण्यासाठी प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधून पर्यावरण पूरक जनजागृती करत असल्याचा सांगितले. आपण पायी पदयात्रा केली हे ऐकून राष्ट्रपती महोदयांनी विशेष अभिनंदन केले. त्याप्रसंगी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी भैय्यासाहेब पाटील व मंगलाताई पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत खासदार उन्मेशदादा भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.