छत्रपती खा. संभाजीराजे यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा पाठींबा

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी छत्रपती खा. संभाजीराजे यांनी यांनी सुरू केलेल्या उपोषणाला शहरातील संभाजी ब्रिगेड संघटनेने पाठींबा दिला आहे. याबाबत तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

मराठा ओबीसीकरण, सारथी संस्थेला सक्षम निधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटी निधी देणेबाबत, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेणे यासह इतर प्रमुख मागण्या निवेदनात नमूद आहेत. सदर निवेदन माननीय उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य यांना रावेर तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले.

 

यावेळी महसूल प्रशासनास निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे रावेर तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, कार्याध्यक्ष योगेश महाजन, शहराध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे, उपाध्यक्ष महेंद्र पाटील, घनश्याम पाटील, हरीश पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, सौरभ चौधरी, दिनेश चौधरी, धीरज पाटील, धनराज सोनवणे, प्रवीण पाटील, तेजस पाटील, मुकेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content