मुक्ताईनगर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांनी मलकापुर तालुक्यातील वाघुड ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तसेच राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तसेच मागील आठवड्यात स्थानिक ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील बोगद्या संदर्भात निवेदन दिले होते. त्यानिमित्त आज N.H.A.I चे अधिकारी श्रीकांत ब्रम्हेकर यांच्यासोबत रस्त्याची पाहणी करून सकारत्मकचर्चा केली. तसेच ग्रामपंचायत वाघुड येथे ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांची बैठक घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी सरपंच मंदाबाई तायडे, उपसरपंच लताबाई घाटे, ग्रामसेवक कु. ए. ए. गोसावी, अरविंद किंनगे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.