मुक्ताईनगर उपजिल्हा रूग्णालयात खा. रक्षा खडसे यांची भेट

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील उपजिल्हा रूग्णालयातील कोवीड रूग्णांसाठी अत्यावश्यक औषधी खा. रक्षा खडसे यांच्याकडून स्व:खर्चाने पुरविण्यात आली. आज रूग्णालयात भेट घेवून रूग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

खा. रक्षा खडसे यांनी रूग्णालयाला भेट दिल्यानंतर रूग्णालयात उपलब्ध सुविधा व समस्या तसचे ऑक्सिजन सुविधेची माहिती घेवून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे यांना सुचना देण्यात आल्यात. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक  मुकेश वानखेडे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, सचिन पाटील,  पवन पाटील ई. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.