बोदवड येथे खा. रक्षा खडसे यांच्याकडून कोरोना रुग्णांसाठी औषधांची मदत

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात खा. रक्षाताई खडसे यांच्याकडून कोरोना रुग्णांसाठी औषधी स्वखर्चाने पुरविण्यात आल्या. तसेच कोरोना सेंटरमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद व समस्यांची माहिती घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारींशी बोलून योग्य त्या सूचना केल्या. 

यावेळी ता. अध्यक्ष प्रभाकर पाटील, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, तालुका उपाध्यक्ष भागवत चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, तालुका सरचिटणीस राजू डापसे, अमोल देशमुख, शहर सरचिटणीस अमोल शिरपुरकर, तालुका बुथ संपर्क प्रमुख दिलीप घुले, तहसीलदार घोलप साहेब, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, गटविकास अधिकारी नागतीलक साहेब, पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड, अतुल दबंग, राम आहुजा, उमेश गुरव, नानकराम आहुजा, डॉ. अमोल पवार, अमोल गिरी, शिल्पा शर्मा, कल्याणी चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content