जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयामध्ये ई-टपाल प्रणाली सुरु करण्याबाबत जिल्हा परिषद जळगाव कामकाजात अधिक सुरळीतपणा होऊन
कामकाजात पारदर्शकता येऊन कर्यालयीन कामकाजाची गतिमानता वाढविण्याकरीता आज दिनांक ३ ऑक्टोबर पासून ई-टपाल प्रणाली वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
ई-टपालप्रणाली बाबत जिल्हा परिषद सर्व अधिकारी व कर्मचारी यांना तज्ञ प्रशिक्षक यांच्याव्दारे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रत्येकाने त्यांच्या कार्यालयास प्राप्त होणारे सर्व टपाल ई-टपाल प्रणालीव्दारेच स्विकारुन पुढील कार्यवाही करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी काढले आहेत. यापुढे ई-टपाल प्रणालीव्दारे प्राप्त दस्ताऐवजावर ई-टपाल प्रणाली क्रमांक नमुद नसल्यास त्याबाबत सम्बन्धित कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेतील कामकाजात अधिक सुरळीतपणा येऊन कामकाजात पारदर्शकता येऊन कार्यालयीन कामकाजाची गतिमानता वाढविण्याकरीता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रणालीव्दारे आवक-जावक विषयक सर्व कामकाज करावे व याकामी सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याची अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकार डॉ. पाटील यांनी व्यक्त केली आहे.