यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियानाचे सातवे सत्र सुरु आहे. हे सत्र तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पोहोचले असून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावल तालुक्यातील आदिवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा अतिदुर्गम क्षेत्रातील राहणाऱ्या आदिवासी बांधवांना लाभ तात्काळ मिळावा, या दृष्टीकोणातून श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास सातवे सत्राला सुरुवात करण्यात आले. या अभियानात वाघाझिरा, जमण्या, गाडऱ्या, उसमडी, आबापाणी, लंगडा आंबा, हेलपाणी, या सारखे आदिवसी पाडे व गावांचा यात समावेश होता. सदर अभियान पाण्याच्या टाकी जवळ वाघझिरा तालुका यावल येथे घेण्यात आले. व या अभियानास एकूण २८७ लाभार्थ्यांनी अभियानाचा लाभ घेतला.
या प्रसंगी सिकंदर तडवी (माजी सरपंच) कुरशाद तडवी, इडा बारेला, बिस्मिल्लाह तडवी, संजय तडवी, मर्जीत तडवी सर, सुंदरशिंग बारेला, सुभाष बारेला, हुशान तडवी, अल्लाउद्दीन तडवी, नदीम तडवी शकील तडवी, संजय बारेला, याकूब तडवी, भारशिंग बारेला, असिफ तडवी, सलीम तडवी, लकड्या बारेला, नामशिंग बारेला, इभराईन तडवी, नर्सिंग बारेला, राजू तडवी, मेहरबान तडवी, सुमारिया बारेला, हमीत तडवी, सिकंदर तडवी, फकिरा तडवी, अकबर तडवी, मदनसिंग बारेला, रमजान तडवी, आशिक तडवी, इस्माईल तडवी आदींची उपस्थिती होती. सागर लोहार, विशाल बारी सुरेश बारेला, हर्षवर्धन मोरे, दिपक नेवे, अक्षय राजपूत, नितीन पाटील आणि आसिफ तडवी यांचे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.