धरणगाव (प्रतिनिधी) शहरात काही दिवसांपूर्वी फिल्टर प्लॅन कार्यान्वित झाल्यासंदर्भात काही पोस्ट व व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. परंतू आज (मंगळवार) रोजी पातालनगरी परिसरात दुषित पाणी पुरवठा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी केला आहे. यामुळे धरणगावात फिल्टर प्लॅन सुरु झाला किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात अधिक असे की, काही दिवसांपूर्वी फिल्टर प्लॅन शुभारंभाचा भव्य कार्यक्रम धरणगावात झाला होता. परंतू अनेक दिवस अशुद्ध पाणी पुरवठा सुरूच होता. परंतू काही दिवसांपूर्वी फिल्टर प्लॅन कार्यान्वित झाल्यासंदर्भात काही पोस्ट व व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. परंतू आज रोजी पातालनगरी परिसरात अशुद्ध पाणी पुरवठा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी केल्यामुळे पालिकेच्या दाव्यांवर प्रश्न उभे राहिले आहेत. दरम्यान, या संदर्भात पालिका प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. तर दुसरीकडे हाजी इब्राहीम यांनी देखील अशुद्ध पाणी पुरवठ्याची फोटो सोशल मीडियात टाकली आहेत.