दिल्ली (वृत्तसंस्था) रमझानमुळे सकाळी सातऐवजी पहाटे पाच वाजता मतदान सुरु करावे, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. रमझानच्या उपवासामुळे उर्वरित तीन टप्प्यांमध्ये सातऐवजी पहाटे पाचला मतदान सुरू करण्यात यावे, अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे रमजानच्या काळात निवडणूक आयोग मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच करते का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळात रमजान देखील सुरु होणार आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी सातऐवजी पाच वाजल्यापासून सुरु करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान “निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा”, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच मध्य भारतात उष्माघातामुळे लोकांना बाहेर पडायला त्रास होतो. तेव्हा त्यांचा विचार करूनही पहाटे पाचला मतदान सुरू करावे असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.