वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; तीन जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव ते जोगलखेडा रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक होत असतांना मंडळाधिकारी यांनी डंपरवर कारवाई केली आहे. याप्रकरणी सोमवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भुसावळ तालुका  पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील  साकेगाव ते जोगलखेडा रस्त्यावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती महसुल विभागाचे मंडळाधिकारी योगीत पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकासह सोमवारी ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता साकेगाव ते जोगलखेडा रस्त्यावरून वाळूने भरलेले डंपर क्रमांक (एमएच १९ झेड १६४४) पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता, डंपर चालक याने उडावाउडविची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत वाळूने भरलेले डंपर जप्त केले. याप्रकरणी मंडळाधिकारी योगीता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी १ वाजात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात डंपर चालक राजेंद्र शिवराम आढाळे (वय-३९), मालक सुनिल नथ्थू परदेशी अणि संदीप बोनीलाल परदेशी तिघे राहणार  साकेगाव ता. भुसावळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करीत आहे.

 

Protected Content