फैजपूर, प्रतिनिधी | या ऐतिहासिक नगरीत शहरातील संत श्री खुशाल महाराज देवस्थानचा अखंडीत १७१ वा स्वयंभू पांडुरंग रथोउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रथोउत्साहात आबालवृद्ध मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.
आज मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी संत खुशाल महाराज यांचा स्वयंभू पांडुरंग रथोउत्सव साजरा केला जातो. मंगळवारी सकाळी ७ वाजता स्वयंभू पांडुरंग मूर्तीची महाअभिषेक महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संध्याकाळी ४ वाजता रथाची पूजा गावातील ब्राम्हण वृदाने विधावत मंत्र म्हटले. हभप पुंडलिक महाराज, प्रविणदासजी महाराज, माजी आ. हरिभाऊ जावळे व आ. शिरीष चौधरी यांचे जावई संजय चौधरी, उन्नती चौधरी सपत्नीक व ऋषिल गोवे यांच्या हस्ते रथाची विधिवत महापूजा करून महाआरती करण्यात आली.यानंतर रथाच्या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. रथाला फुलांनी व विद्युत रोषणाईने आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. संध्याकाळी सुभाष चौक येथे महाआरती करण्यात आली. तसेच गावातील श्रीराम मंदिर येथे देखील महाआरती करण्यात आली. राथोउत्सवाच्या तीन मोठ्या महाआरत्या करण्यात येतात. दुपारी ४ वाजता मिरवणुकीला सुरुवात होऊन रात्री १० वाजता पुन्हा रथ गल्ली येथे रथाचे पुनरागमन होते.
रथमार्गावर रांगोळीची सजावट
रथाचा मार्ग हा होले वाडा, लक्कड पेठ, मोठा मारोती, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड, श्रीराम मंदिर, जुने हायस्कुल पुन्हा रथगल्ली या संपूर्ण मार्गावर प्रत्येक महिलांनी पाण्याचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच काही नागरिकांनी आपल्या घराच्या छतावरून रथावर पुष्पवृष्टी करून रथाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
संस्कार भारतीतर्फे काढण्यात आली रांगोळी
गेल्या १५ वर्षांपासून शहरातील कला शिक्षक राजू साळी हे सुभाष चौकात रथाच्या स्वागतासाठी ९० किलोची भव्य दिव्य संस्कार रांगोळी काढून विशेष स्वागत केले जाते. यासाठी त्यांना विक्की जैस्वाल, ललित कोष्टी, निलेश निंबाळे, व राजू कुंभार यांनी सहकार्य केले. मी १५ वर्षांपासून स्वयंभू पांडुरंग रथोउत्सवाची सेवा करत आहे. ही सेवा करतांना माझ्या मनाला समाधान मिळते. लोकांचे रुपी लोकांच्या मनात पांडुरंग सामावलेला असून हाच माझा उद्देश रांगोळी काढण्याचा आहे असे कला शिक्षक राजू साळी यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
फैजपूर पालिका भाजप गटनेते मिलिंद वाघूळदे, काँग्रेस गटनेते कलीम मण्यार, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मसाका माजी संचालक नितीन राणे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र होले, डॉ. सुनिल पाटील, माजी नगरसेवक केतन किरंगे, राकेश जैन, अनिल नारखेडे, यासह शहरातील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
यांनी ठेवला चोख पोलीस बंदोबस्त
डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश वानखडे, एसआय हेमंत सांगळे, योगेंद्र मालवीय, राजेश बऱ्हाटे, गोपीनियचे मोहन लोखंडे, गोकुळ बयास, यशवंत टहाकळे आरसिपी प्लॅटून यासह यावल, रावेर व निंभोर येथील पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला.
महावितरण विभागाची टीम होती सक्रिय
रथ उत्सव मार्गावरील वीजतारा रथाला अडथळा ठरणार नाही याची काळजी महावितरण विभागाची टीम संपूर्ण रथ मार्गावर लक्ष घालून होती. टप्प्याटप्प्याने गावातील काही वीज बंद करत होते. यामुळे नागरिकांना व रथाला जास्त अडथळा आला नाही.
भजनी मंडळाचाही सहभाग
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण बामृद संघ बीडचे अध्यक्ष परमपूज्य विठ्ठल आनंद प्रभू आणि बोदवड, शेलवड, रावेर, मुक्ताईनगर निमखेडी व पंचक्रोशीतील इस्कॉनचे भक्तजन रथयात्रेत सामील झाले तसेच कळमोदा,फैजपूर, अमळनेर, येथील भजनी मंडळाचा सहभाग होता.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3008476269377495/