जळगावात दुकान फोडले ; सव्वा लाखाची रोकड लंपास (व्हीडीओ)

02ea4834 2775 4d0d 8b3b b2e281e0b110

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवीन बीजे मार्केटमधील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वा लाखाची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून सततच्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील नवीन बीजे मार्केटमधील 293 नंबरमध्ये नारळ व्यापारी अमजद पठाण यांचे लकी महाराष्ट्र नारियल सप्लायर्सचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्री लोखंडी रॉडने दुकानाचे शटर वाकवून दुकानमध्ये प्रवेश केला. त्यांनतर दुकानातील कपाटाचे लॉक तोडून 1 लाख 20 हजार रुपये लांबीवले. रात्री पाऊस सुरु असल्यामुळे अमजद पठाण यांनी दिवसभरातील धंद्याची रक्कम दुकानात ठेवलेली होती. पठाण आज सकाळी नेहमीप्रमाणे 7 वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, मागील काही दिवसापासून शहरात दररोज रोजी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

Protected Content