विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भंडारा आणि अकोला जिल्हयात अवकाळी पावसांमुळे दोन्ही जिल्हयातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे भातपिकांसह पालेभाजी पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
जिल्हयातील मिरचीच्या बागायती शेतीलाही फटका बसला आहे. अनेक शेतातील मिरची पकी जळून खाली पडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अकोला जिल्हयातील हिवरखेड, झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना मोठा फटका बसला असून संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, फळे, भाजीपाला, धान्य आणि विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

Protected Content