आमदार व खासदार यांच्या प्रयत्नाने विद्यार्थी व नोकरवर्गाची गैरसोय टळली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज मुंबईहून खा. स्मिताताई वाघ व आ. राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगाव रेल्वे स्टेशनला उतरले. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेजचे विद्यार्थ्यांची परिक्षा होती. परंतू भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताचा मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने सर्वांची गैरसोय झाली.

यावेळी विद्यार्थ्यांना व नोकरवर्ग यांना चाळीसगाव व पाचोरा येथे जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी उपलब्ध नव्हती. यावेळी ही बाबत आमदार राजूमामा भोळे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी ही गोष्ट समजली. त्यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर (२२१८४) साकेत सुपर फास्ट एक्सप्रेस जळगाव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे निर्देश दिले. यावेळी विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गाची गैरसोय टळली. यावेळी विद्यार्थिनी व प्रवाश्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांचे आभार मानले. मुलींना त्याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही.

Protected Content