धानवड येथील शेतकऱ्याच्या पशूधनाची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव । तालुक्यातील धानवड येथील कैलास लक्ष्मण पाटील यांच्या ६० हजार रूपये किंमतीचे गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आज  ११ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी आज बुधवारी  दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञातव्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धानवड येथील शेतकरी कैलास पाटील हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी गुरे घेवून ते घरी आले. रात्री १०.३० वापजता त्यांनी गुरांना चारा व पाणी देवून घरी झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे २० हजार रूपये किंमतीची गाय, ४० हजार रूपये किंमतीचे दोन बैल असे एकुण ६० हजार रूपये किंमतीचे पशुधनाची चोरून नेले. हा प्रकार आज बुधवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. परिसरात व जंगला गुरांची शोधाशोध केली पंरतू आढळून आले नाही. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गुरांची चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.

Protected Content