पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा ते जळगाव आणि पाचोरा ते चाळीसगाव या दोनही रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र या वाहतूकीमुळे रस्त्यावर प्रचंड धुळे उडत असल्याने लहान वाहनांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. रोडचे काम होत असतांना ठेकेदार यांनी पाण्याचा वापर कमी केल्यामुळे या धुळीचा प्रकार वाढत असल्याची आरोड वाहनधारकांकडून होत आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या दोन ते तीन महिन्यापासून चाळीसगाव ते जळगाव व्हाया पाचोरा या रोडाचे काम करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या कामांच्या गतीनुसार हे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान पाचोरा तालुक्यातील नांद्रा ते हडसन या दरम्यानच्या सुरूवात केलेल्या रोडचे काम मोठ्या प्रमाणावर जरी असला तरी संबंधित ठेकेदार रोडवर पाण्याचा मारा कमी प्रमाणावर करत असल्यामुळे होणाऱ्या वाहतूकीमुळे रोडवरील मातीचे रूपांतर धुळीत झाले आहे. त्यामुळे लहान वाहने किंवा दुचाकीधारकांना वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. अश्या धुळीतून वाहन चालविणे म्हणजेच आजरांना आमंत्रण देणे असा होत आहे. जळगाव पाचोरा रोडचे काम चालू असून सदर रोडवर पाणी मारत नसल्यामुळे वरीलप्रमाणे धूळ उडते, त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. ठेकेदारच्या या ओबडधोबड कारभारामुळे या रोडवरुन प्रवास करणे मृत्यूच्या झुंज पेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया वाहनचालकांकडून बोलले जात आहे.
पहा । पाचोरा-जळगाव रस्त्यावरील धुळ कशी उडते ते