पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील रविवारपेठेत किरकोळ वादातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुचाकी पुढे घेतांना झालेल्या वादातून रिक्षा चालकाने दुचाकीस्वार चालकाच्या हाताला चावा घेऊन त्यांच्या अंगठ्याचा पुढचा भाग तुटून पडला आहे. ही घटना १७ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास रविवार पेठेतील राजहंस मेटल समोर घडली. याप्रकरणी रिक्षा चालक गणेश सोमनाथ भुसावळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, ज्ञानेश्वर बेंद्रे हे पोलीस दलातून निवृत्त झाले आहे. ते रविवार पेठेतून पत्नीसह जात जात होते. ते दुचाकीवर पत्नीसह रविवार पेठेत घरगुती सामान खरेदीसाठी आले होते. बेंद्रे हे राजहंस मेटल समोरून दुचाकी बाहेर काढत असताना रिक्षा चालक गणेश सोमनाथ भुसावळकरला थांबावे लागले. याकारणावरून आरोपी भुसावळकरने बेंद्रे यांना पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात असे म्हणत शिवीगाळ केली. बेंद्रे याचा जाब विचारायला गेले असता आरोपीने त्यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की केली आणि उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोराचा चावा घेतला. यामध्ये बेंद्रे यांचा नखापासूनचा पुढचा भाग तुटून पडला. यामुळे बेंद्रे यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.