दुचाकीची चैन तुटल्याने एक जखमी

jakhami

जळगाव प्रतिनिधी | औषधी घेऊन जात असताना दुचाकीची चैन अचानक तूटल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनील पंडित कोळी (वय-50) रा. दोनगाव ता. यावल हे औषधी घेण्यासाठी दोनगाव येथून जळगावला दुचाकी क्रमांक एमएच 19 झेड 6442 ने आले होते. औषधी घेतल्यानंतर पुन्हा दोनगावकडे जाण्यासाठी निघाले असतांना ममुराबाद रस्त्यावर असलेल्या वीटभट्टीजवळ दुचाकीची अचानक चैन तुटल्याने दुचाकी घसरल्याने सुनील कोळी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Protected Content