दुचाकीची सामोरासमोर धडक : दोन ठार

पाचोरा, प्रतिनिधी | पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील भोजे गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दोन महाविद्यालयीन तरूण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. या दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नरेंद्र भगवान गव्हाळे (वय – २०), रा. चिंचपुरे ता. पाचोरा व जीवन संतोष कदम (वय – १७) रा. भोजे ता.पाचोरा या तरुणांच्या नावांचा समावेश असून इतर दोन जखमी जखमी तरुण बबन तडवी (वय – २५) व जब्बार तडवी (वय – ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ते पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अपघात झालेल्या दोन्ही दुचाकींचे क्रमांक एम. एच. १९ डी. ए. ०३६१ व एम. एच. १९ – १४३६ असे असून अपघाताचे वृत्त कळताच १०२ रुग्णवाहिका चालक बाजीराव गीते यांनी चौघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भरती केले दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकक डॉ. अमित साळुंखे यांनी दोघांना मृत घोषित केले आहे.

दरम्यान घटनेचे वृत्त कळताच जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे परेश पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती. तर अपघातस्थळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे रणजित पाटील, अरुण राजपूत, संदीप राजपूत, सचिन वाघ या कर्मचाऱ्यांनी धाव घेत रुग्णवाहिका बोलावत जखमींना पाचोरा रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली.

Protected Content