दुचाकी घसरल्याने तरुण गंभीर जखमी

accident jal

जळगाव प्रतिनिधी | शेतातील गुरांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या तरुण दुचाकीने परतत असतांना दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, भीवा पुंजू वाघ (वय-30) रा. अंजनेर ता. यावल हा शेतमजूर असून शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी दुचाकीने गेला होता. बैलांना चारा टाकून घरी दुचाकीने परतत असतांना दुचाकी घसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारार्थ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content