जळगाव प्रतिनिधी । नातेवाईकाकडे लग्नाला गेले दोघे मित्र लग्न लावून घरी परतत असतांना देवुळगाव जवळ अचानक दुचाकी घसरल्याने वराडसीम येथील दोघे जण गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे तर दुसरा बेशुध्दावस्थेत आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रकाश अनिल सपकाळे रा. वराडसीम ता. भुसावळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर गावाजवळ देवुळगाव येथे नातेवाईकांच्या लग्नाला मित्रासह दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्न लागून दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास गावाकडे परतत असतांना देवुळगाव जवळ अचानक दुचाकी घसरली. त्यांनी दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने शासकीय जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान दोघांपैकी प्रकाश हा बेशुध्दावस्थेत आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे.