भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात पुण्याहून चोरून आणलेली दुचकीसह चोरट्यास भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली असून पुढील कारवाईसाठी पुणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील वाय पाईट येथे भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलीस नाईक सुनिल थोरात, नरेंद्र चौधरी, दिपक जाधव, अनिल पाटील पो.काँ प्रशांत चव्हाण, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, उमाकांत पाटील, संदिप परदेशी असे वरील पो.कर्मचारी भु.बा.पेठ पो.स्टे हदीत पेट्रोलिंग करत असतांना अर्जुन शिवचरण चौरसिया वय-25 रा.खारा ता. तिलोही जि.अमेठी राज्य उत्तर प्रदेश हा अँक्टीव्हा क्रमांक एमएच १२ एनएल ३००२ ला ढकलत असतांना त्याला विचारले असता त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याला खाक्या दाखवताच त्याने ॲक्टीवा पुण्यातील कोंडवा भागातून चोरली असल्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी कोंढवा पोलीस स्थानकाच्या पोलीसांच्या चौकशीसाठी दुचाकी आणि आरोपीस ताब्यात देण्यात आले.