Home क्राईम दारूच्या नशेत पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा दाखल

0
25

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजीव गांधी नगरातील ४० वर्षीय विवाहीतेवर दारुच्या नशेत पतीने हल्ला चढवुन गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, संगिता रमेश झेंडे (वय-४०) या राजीव गांधीनगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्याचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हा काल संध्याकाळी दारुच्या नशेत घरी आला. काहीएक कारण नसतांना वाद घालून पत्न संगिताला लोखंडी पट्टीने हल्ला चढवून खांद्यावर, डाव्या बरगडीवर, मनगटावर जखमी करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. जखमीच्या तक्रारीवरुन संशयीत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटिल करत आहेत.

 


Protected Content

Play sound