
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधलीपुरा येथील शेती संघाजवळ दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार, २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घडली असून, या प्रकरणी सोमवार, २८ जुलै रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलाबाई श्रावण संदानशिव (वय ६५, रा. गांधलीपुरा, अमळनेर) या वृद्ध महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. रविवार, २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कमलाबाई संदानशिव घरी असताना अरबाज अत्तर पठाण (रा. गांधलीपुरा, अमळनेर) याने दारूच्या नशेत त्यांच्या घरी येऊन त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, त्याने कमलाबाई संदानशिव यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकाराने घाबरलेल्या कमलाबाई संदानशिव यांनी तात्काळ अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी अरबाज अत्तर पठाण (रा. गांधलीपुरा, अमळनेर) याच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करत आहेत.



