पारोळा प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन, स्वामित्व योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत गावांचे ड्रोनद्वारे पारोळा तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले.
दरम्यान, या गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत गावे चुना मार्किंग करून ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण सुरु असून ड्रोनव्दारे गावठाण भूमापन मोजणी प्रकल्पाचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते सावखेडे होळ ता.पारोळा येथे संपन्न झाला.
या सर्वेक्षणासाठी सर्वप्रथम जळगांव जिल्ह्यातुन पारोळा तालुक्यातुन सावखेडे होळ गावाची निवड केल्याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांचे आमदार चिमणराव पाटील मतदारसंघाच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जि.प.सदस्य हिंमत पाटील, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख जळगांव एम.पी.मगर, गटविकासअधिकारी विजय लोंढे, सर्व्हे आॕफ इंडियाचे नवनाथ उगलमुगले, मोहन डेरे, उपअधिक्षक भूमिअभिलेख पारोळा भुषण घाडगे यांसह सावखेडे होळ, सावखेडे मराठ, सावखेडे तुर्क, सार्वे, येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.